Ad will apear here
Next
वो जब याद आये
हिंदी चित्रपटात पार्श्वगायनाला १९३५मध्ये सुरुवात झाली. ज्यांना गाणे म्हणता येत असे ते त्या वेळी चित्रपटाचे नायक-नायिका असत. त्या वेळी के. एल. सैगल हे नायक व गायक म्हणून लोकप्रिय झाले. नूरजहाँ, सुरय्या यांनीही दोन्ही आघाड्या सांभाळल्या. पुढे किशोर कुमार यात यशस्वी ठरले. त्या काळातील गायकांचा परिचय अशोक उजळंबकर यांनी ‘वो जब याद आये’ म्हणून करून दिला आहे.

पार्श्वगायनाची कथा, पार्श्वगायकाची परंपरा आधी सांगून प्रथम परिचय अर्थात कुंदनलाल सैगल यांचा येतो. पुढे पंकज मलिक, जी. एम. दुराणी, सुरेंद्र, नूरजहाँ, शमशाद बेगम, सुरय्या, जगजीत कौर, तलत महमूद, महंमद रफी, मुकेश, लता मंगेशकर, अशा भोसले, गीता दत्त, मन्ना डे, सुमन कल्याणपूर, किशोर कुमार आदी २६ गायक-गायिकांची ओळख व सोबत त्यांच्या गाजलेल्या गाण्यांची यादी दिली आहे; तसेच के. सी. डे, खुर्शीद, काननदेवी, अमीरादेवी कर्नाटकी, जोहराबाई अंबालेवाली, शांता आपटे आदींचा परिचयही यात करून दिला आहे.     
      
पुस्तक : वो जब याद आये
लेखक : अशोक उजळंबकर
प्रकाशक : अजिंक्य प्रकाशन
पाने : २४७
किंमत : २५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZWHBY
Similar Posts
खिळवून ठेवणारी त्रि-सिनेधारा ‘मस्ट सी’ कॅटेगरीत आज दुसरी फिल्म, नव्हे खरं तर तीन फिल्म्स एकत्र! कारण एकाच कथेत या तीन फिल्म्स गुंतल्या आहेत. खरं पाहता तिन्ही फिल्म्स एकमेकांशिवाय अपूर्ण; कारण कथा आणि कथेतल्या पात्रांना वेगवेगळ्या काळांत जाऊन भेटल्याशिवाय आणि काही गोष्टी ‘घडवून आणल्याशिवाय’ कथा अपूर्ण! गोंधळलात ऐकताना? मग त्यासाठी
दीप्ती नवलना बनवायचा होता अमृता शेरगिल यांच्यावर चित्रपट मुंबई : ‘ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका दीप्ती नवल यांनी प्रसिद्ध भारतीय चित्रकर्ती अमृता शेरगिल यांच्यावर चित्रपट काढण्याचे ठरवले होते. त्यासाठी खूप संशोधनही केले होते,’ अशी माहिती अभिनेता जिम्मी शेरगिलने अलीकडेच एका कार्यक्रमात दिली. अमृता शेरगिल यांच्या कार्याची माहिती होण्यासाठी त्यांच्यावरील चित्रपट
प्रादेशिक भाषांचे चित्रपट पहा बिगफ्लिक्सवर मुंबई : अनिल डी. अंबानी यांच्या रिलायन्स एन्टरटेन्मेंटचा बिगफ्लिक्स हा चित्रपटांसाठीचा पहिलावहिला प्लॅटफॉर्म आता जगभरातील प्रेक्षकांसाठी ब्लॉकबस्टर ठरला आहे. रिलायन्स एन्टरटेन्मेंटने नऊ भाषांतील ‘बिगफ्लिक्स’ची घोषणा करून जागतिक बाजारपेठेत बहु-भाषिक अॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. या अॅप्लिकेशनला भारतासह परदेशातही मोठा प्रतिसाद लाभत आहे
पॅटन सैनिकांमध्ये स्फूर्ती आणि चेतना निर्माण करणारं बेधडक आणि घणाघाती भाषण करणाऱ्या आणि तितक्याच बेधडकपणे शत्रूशी लढणाऱ्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्या अमेरिकेच्या जनरल पॅटनवरची फिल्म म्हणजे ‘पॅटन.’ आजच्या ‘सिनेसफर’मध्ये त्या फिल्मविषयी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language